Breaking

Sunday, 30 May 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - उपरित पडलेल्या पहिल्या ठिणगीमुळेच जिल्ह्यात वातावरण निर्माण झाले....आता उजनीच्या पाण्याचे संरक्षण महत्वाचे...अतुल खुपसे-पाटील.


पंढरपूर,टीम,


उपरित पडलेल्या पहिल्या ठिणगीमुळे जिल्ह्यात वातावरण निर्माण झाले,आता उजनीच्या पाण्याचे सौरक्षण महत्वाचे--अतुल खूपसे








             
सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण वरदायी आहे.या धरणामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग बागायती झाला आहे. शेती सुजलाम-सुफलाम झाल्यामुळे आर्थिक दृष्ट्या शेतकरीही संपन्न होत आहे. परंतु या धरणातील पाण्यावर राजकीय हस्तक्षेपातून डल्ला मारण्याचा प्रयत्न पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी केला. इंदापूर तालुक्यातील 22 गावांना 5 टीएमसी पाणी देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हाणून पडला आहे. शासनाने इंदापूर मध्ये पाणी नेण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा झाला आहे. संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार उग्र आंदोलनाची पहिली ठिणगी उपरी ता. पंढरपूर या तालुक्यात पडली. त्यामुळे तेथून खऱ्या अर्थाने वातावरण निर्माण झाले,आंदोलनाचा वनवा पेटला,महाविकास आघाडी सरकार नमले व पाणी देण्याचा निर्णय रद्द झाला. आता यापुढे पाण्याचे संरक्षण महत्त्वाचे राहणार असल्याचे उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी सांगितले आहे.









उपरी ता. पंढरपूर येथे उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या  पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघर्ष समितीचे सचिव माऊली हळनवर, रयत क्रांती चे दीपक भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर, नगोली ता.माढा सेवा सोसायटीचे चेअरमन रामदास खराडे यांचा सत्कार करण्यात आला.








या प्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण, उपसरपंच महेश नागणे, ग्रामपंचायत सदस्य सुरेशशेठ नागणे,निवास नागणे,विक्रांत जगदाळे, वैभव नागणे,जयसिंग नागणे, दीपक नागणे,सोमनाथ नागणे आदी उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना अतुल खूपसे म्हणाले की,उपरी हे गाव आंदोलकांचे व अन्यायाविरुद्ध एकत्र येत लढा देणारे गाव आहे.गावात उग्र आंदोलनाची सुरुवात झाली,पहिली ठिणगी पडली त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्माण होऊन त्याचे लोण सर्व ठिकाणी पोहचण्यास सुरुवात झाली.







या सर्व आंदोलनाची शासनाने दखल घेत लेखी आदेश काढला व इंदापूर ला जाणारे पाणी रद्द झाले .हा सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून आता पाणी वाचले मात्र या पुढे आता पाण्याचे सौरक्षण करावे लागणार आहे.व ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांवर अन्याय होईल त्या वेळेस आम्ही रस्त्यावर येऊन त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही असे खूपसे यांनी सांगितले.







या आता पुढची लढाई कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी  होणार आहे असे दिपक वाडदेकर यांनी सांगितले, तर 35 गावच्या पाण्यासाठी आम्ही आता आपला मोर्चा तिकडे वळवनार असून तेथील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देणार आहोत असे माऊली हळनवर यांनी सांगितले. लॉकडाऊन संपल्यानंतर थकीत एफपारपी जिल्ह्यात मोठे शेतकरी आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा याप्रसंगी दीपक भोसले यांनी दिला.






 उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्व शेतकऱ्यांचा एकजुटीचा हा सर्वात मोठा विजय असल्यामुळे यापुढे ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने एकत्र लढा उभारला जाईल असा इशारा या प्रसंगी या  पदाधिकाऱ्यांनी यांनी दिला.

No comments:

Post a Comment