मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज - सध्या कुरणवाडी येथे कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे, आणी नागरिकांना लसीकरणासाठी बाहेरगावी जावे लागते, व हे अंतर लांब असल्याने गावातच लसीकरण चालू करण्याची मागणी कुरणवाडीतून जोर धरू लागली आहे.
मौजे कुरणवाडी ता.मोहोळ येथे लसीकरण चालू करण्याची मागणी- याबाबत वृत्त असे की मौजे कुरणवाडी ता मोहोळ या गावातच लसीकरण करण्यात यावे, मौजे कुरणवाडी हे गाव अनगर प्रा.आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असल्याने लसीकरणासाठी लस ह्या शेटफळ व आष्टी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात येतात परंतु तेथील कर्मचारी त्या गावातील लोकांच्या याद्या करून त्यांनाच लस देतात, त्यामुळे कुरणवाडी गावातील नागरिक लसीकरणापासून वंचित रहात असून त्यांचे विनाकारण हेलपाटे होत आहेत.
तरी यासंदर्भात आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन कुरणवाडी गावातच लसीकरण करावे, अन्यथा दखल न घेतल्यास कुरणवाडी ग्रामस्थ दि.25 मे रोजी आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर किंवा उपोषणाला बसण्याचा ठराव कोरोना समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
व अशा प्रकारचे निवेदन मोहोळ तालुका तहसीलदार सो यांना ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच, कोरोना समिती यांच्या वतीने देण्यात आले आहे. तहसीलदार साहेब कुरणवाडी गावातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कितपत प्रयत्न करतात तेच पाहणे आता गरजेचे आहे.
कुरणवाडी हे गाव मोहोळ तालुक्यात येत असून या गावात दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे, तरी नागरिकांना लसीकरण बाहेर जावे लागते, व त्यांना बाहेरगावी सुद्धा लस मिळत नाही, त्यामुळे गावातच लसीकरण चालू करण्याची मागणी कुरणवाडीतून जोर धरू लागली आहे.


No comments:
Post a Comment