सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - माढा तालुक्यासाठी कोरोना चाचणी साठी आवश्यक असणारे रॅपिड अॅन्टीजन टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात यावे....शिवाजीराजे कांबळे यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन-
याबाबत वृत्त असे की माढा तालुक्यात 32 आरोग्य केंद्रात व उपकेंद्राच्या माध्यमातून कोरोना टेस्ट केल्या जात होत्या, परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात रॅपिड अॅन्टीजन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाल्याने टेस्ट करणे बंद झाले आहे, त्या मुळे नागरिकांनमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिक वारंवार प्राथमिक आरोग्य केंद्रावरती जाऊन विचारणा करतात, परंतु कोरोना चाचणी साठी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट किट उपलब्ध नाहीत अशा प्रकारचे उत्तरे त्यांना मिळतात, तरी माढा तालुक्यातील सर्व कोरोना चाचणी करणार्या केंद्रांना रॅपिड अॅन्टीजन टेस्ट किट वेळेवर उपलब्ध झाले तर कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल, त्यामुळे माढा तालुक्यातील सर्व कोरोना चाचणी करणार्या केंद्राना आज तातडीने रॅपिड अॅन्टीजन टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment