Breaking

Monday, 24 May 2021

मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 24/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती.


मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 24/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- याबाबत वृत्त असे की सध्या सोलापूर जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे आणी यामुळेच सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यात कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. प्रशासनाने सुद्धा कडक पाऊले उचलली आहेत. विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई केली जात आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली आहेत. मेडिकल व दवाखने वगळता सर्व दुकाने पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली आहेत. 










                            सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा मोठ्या धैय्याने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. जिल्हातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्व प्रकारची मदत पुरविली जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे नागरिकांना व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला वारंवार सूचना करत आहेत. तरी सुद्धा काही लोक विनाकारण बाहेर पडत आहेत, मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा, सोशल डिस्टंस ठेवून वागावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बाहेरून आल्यावर आपले हात स्वच्छ साबणाने धुवावेत, अशा प्रकारचे सूचना जिल्ह्यातील नागरिकांना वारंवार दिल्या जात आहेत, सोलापूर शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे.











ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती गंभीर दिसून येत असून प्रशासनाने सध्या ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लक्ष केंद्रित केले असून लवकरच ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात येईल असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकार्यांना वाटतो, लसीकरण करून घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढले असून, 











नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, सोशल डिस्टंस ठेवून वागावे, मास्क व सॅनिटायझर वाटप चा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हे जर नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन केले तर ग्रामीण भागातील कोरोना लवकरात लवकर आटोक्यात येईल. 








               दि.24/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, 









आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्ण संख्या, सोलापूर जिल्ह्यातील मयत रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी तालुका वाईज दिली आहे ती पुढील प्रमाणे.......





No comments:

Post a Comment