मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा- याबाबत वृत्त असे की सध्या करुणा महामारी च्या वातावरणामुळे प्रत्येक माणूस मानसिक दबावाखाली राहत असल्यामुळे त्यांचे स्वास्थ्य ठीक राहिलेले नाही ग्रामीण भागातील अनेक नागरिक भयभीत झाले आहेत अशा भयावह वातावरणामुळे कोरणा चाचणीत पॉझिटिव आल्यानंतर सीसीसी व डी सी एच मधील बरेचसे रुग्ण मानसिक दबावाखाली येऊन उपचारही व्यवस्थित रित्या घेत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे घाबरू नका काळजी घ्या हा संदेश प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार देऊनही खूप नकारात्मक बातम्या समोर येत आहेत काही पॉझिटिव रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर येत आहेत जिल्हापरिषद प्रशासनातर्फे माझगाव कोरोना मुक्त गाव ग्रामस्थांना शपथ देणे प्रभात फेरी माझं दुकान माझी जबाबदारी गाव भेटी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या सर्व उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रबोधन होण्याची नितांत गरज आहे सध्याचे वातावरण व कोरोनाची मनामध्ये असलेली भीती परिसरातील नागरिक व कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू किंवा त्याविषयीच्या बातम्या हेसुद्धा नागरिकांच्या मनामध्ये ताण निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण आहे ग्रामीण भागात भेटी देऊन नागरिकांच्या सहवासात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यात प्रचंड ताण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले या सर्व गोष्टींचा विचार करता नागरिकांच्या मनातील ताण भीती या सर्व गोष्टींचे निराकरण होऊन त्याचे व्यवस्थापन होणे नितांत गरजेचे आहे विविध ठिकाणी असलेले रुग्ण हे मानसिक विचारांमुळे भीतीमुळे काळजीमुळे औषधा सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत अनेक अधिकारी कर्मचारी विशेषतः आरोग्य ग्रामविकास पोलीस महसूल औषध प्रशासन तसेच खाजगी क्षेत्रात काम करणारे अधिकारी कर्मचारी व मजूर हेसुद्धा प्रचंड तणावाखाली आहेत रात्रंदिवस स्थान व काळजी धावपळ तसेच त्यांच्या कुटुंबातील कोरोना ग्रस्त रुग्णांची काळजी या सर्व गोष्टींमुळे ताण-तणाव खूप वाढलेला आहे त्याकरिता विविध माध्यमांच्या सहकार्याने तान तणाव विषयी कार्यशाळा व्याख्यान आधी घेऊन नागरिकांची मानसिक स्वास्थ्य सुधारण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यामुळे ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळा हा उपक्रम घेण्याचा निश्चित करण्यात येत आहे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे जाहीर केली आहे
Thursday, 29 April 2021
मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment