करकंब प्रतिनिधी/ संजय काळे-करकंब येथे कोव्हिड सेंटरला अखेर मंजुरी- याबाबत वृत्त असे की करकंब ता.पंढरपूर येथील कोविड सेंटर साठी माजी सभापती सौ.रजनीताई देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी केली होती, अखेर त्यांच्या या मागणीला मंजुरी मिळाली आहे, करकंब येथे कोव्हिड सेंटर सुरू करावे यासाठी पंचायत समिती चे राहूल काका पुरवत यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचेकडे पत्राद्वारे
मागणी केली होती, करकंब गावच्या सरपंच सौ. तेजमाला पांढरे व उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी जिल्हाधिकारी व आमदार बबनदादा शिंदे यांचेकडे मागणी केली होती, कोविड सेंटर हे जिल्हा परिषद शाळा येथे रविवार पासून सुरु होत आहे, याचा फायदा करकंब व परिसरातील 20-22 गावातील रूग्णांना होणार आहे, मास्क व सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टंस ठेवून वागणे हे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment