Breaking

Thursday, 29 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला, उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा आदेश रद्द न केल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी हजारो शेतकर्यांसोबत उजनी धरणात जलसमाधी घेऊ...उजनी पाणी बचाव समीतीचा इशारा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला, उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा आदेश रद्द न केल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी हजारो शेतकर्यांसोबत उजनी धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा इशारा- याबाबत वृत्त असे की नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी हे सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी इंदापूरला नेलं आहे आणी तसे शासन दरबारी आदेशही काढण्यात आले आहेत, उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याला लाभलेले वरदायिनी आहे, उजनी धरण बांधताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांच्या जमीनी धरणासाठी गेलेल्या आहेत व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे व शेतकर्यांचे जीवन हे उजनी धरणावर अवलंबून आहे, त्यामुळे इंदापूरला नेण्यात आलेले पाच टीएमसी पाणी हा आदेश रद्द करावा अन्यथा न केल्यास 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी हजारो शेतकर्यांसोबत उजनी धरणात जलसमाधी घेऊ व आंदोलन करू असा इशारा सोलापूर जिल्हा उजनी पाणी बचाव समीतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री सोलापूर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अधिक्षक अभियंता सो.जलसंपदा सोलापूर, पोलिस निरिक्षक सो.टेंभूर्णी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment