कोरोनाची परिक्षिती हाताबाहेर गेल्याने उद्या, मंगळवार सायंकाळपासून संपूर्ण कर्नाटकात लॉक डाउन जारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरवड्यात कोरोनाची लाट रोखण्यात अपयश आल्यास आणखी आठवडाभर लॉक डाउन सुरूच ठेवण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
देशाच्या इतर भागाप्रमाणेच कर्नाटकातही कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असून, अनेक उपायानंतरही कोरोना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. सरकारच्या कोविड सल्लागार समितीनेही राज्यात संपूर्ण लॉक डाउन जारी करण्याची शिफारस केली होती. त्याचप्रमाणे अनेक लोकप्रतिनिधींनीही लॉक डाउनच्या बाजूने कौल दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment