सोलापूर जिल्हयातील दक्षिण व उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्याकरीता सिना नदीत तात्काळ पाणी सोडण्यात यावे.
सोलापूर : सोलापूर जिल्हयातील दक्षिण व उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तीन्ही तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्याप्रमाणात होत आहे. सध्या सीना नदीमध्ये पाणी नसल्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगांव, पाकणी, नंदूर व दक्षिण तालुक्यातील हत्तूर, वांगी, वडकबाळ, चंद्रहाळ, सिंदखेड, मनगोळी, अकोले (मं.), गुंजेगाव, होनमुर्गी, राजूर, बिरनाळ, बंकलगी, आहेरवाडी, औराद, संजवाड, बोळकवठे आणि अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव आदि 25 गावातील शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहेत, पाण्याअभावी येथील पिके जळून जात आहेत. सदर भागामध्ये जनावरांना व माणसांना पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. सदरची पाणी टंचाई दुर होण्याकरीता तात्काळ उजनी धरणाचे पाणी सिना नदीत सोडण्यात यावे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मंत्री, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास श्री. जयंत पाटील साहेब यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.
No comments:
Post a Comment