Breaking

Wednesday, 28 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बावी येथे ग्रामपंचायतीची कोरोना दक्षता कमीटी मिटींग संपन्न.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बावी येथे ग्रामपंचायतीची कोरोना दक्षता कमीटीची कोरोना परिस्थिती वर बैठक- याबाबत वृत्त असे की सध्या कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता बावी येथे दक्षता कमीटीची मिटींग पार पडली, यामध्ये विनामास्क फिरणार्यांवर कडक कारवाई व दंड वसूल करण्याचे ठरले व गावातील दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी 7-11 या वेळीच चालू ठेवावीत व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवा असे दुकानदारांना सूचित केले आहे, तसेच नियमांचे पालन न केल्यास 500 रूपये दंड आकारण्याचे ठरले, तसेच गावातील व्यक्ती पाॅझीटीह्व आल्यावर त्यास कोविड सेंटर मध्ये तातडीने दाखल करण्यात यावे असाही निर्णय घेतला, या मिटींग साठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सदस्या, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment