Breaking

Tuesday, 23 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/मारूती सोमुत्ते- सातार्यातील युवकाची दुकानामध्येच आत्महत्या.


, सातारा, दि.२३: येथील पोलीस मुख्यालयापासून जवळच असलेल्या मल्हार पेठेतील इलेक्ट्रिशियन व्यवसायिक रोहित बोधे (वय ३०, रा.शाहूपुरी, सातारा) यांनी सोमवारी दुकानामध्येच आत्महत्या केली. ही घटना सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्का बसला. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हीलमध्ये नेला. बोधे यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अद्याप समोर आले नाही .रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

No comments:

Post a Comment