पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या राधिका कांबळे यांना तात्काळ कामावर रूजू करून घ्या बहुजन सत्यशोधक संघाचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री सो यांना निवेदन- याबाबत वृत्त असे की पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या सपोर्ट स्टाफ राधिका कांबळे यांच्यावर अन्याय व अत्याचार झाल्यामुळे बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी यांना युवा जिल्हाध्यक्ष गणेश देवकते व जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे, महिला जिल्हाअध्यक्ष ज्योतीताई भुजंगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे, राधिका कांबळे ह्या गेल्या पाच वर्षापासून पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सपोर्ट स्टाफ या पदावर काम करत आहेत ,तरी दि.27/12/2020 रोजी सदर रूग्णालयातील कपडे वाळविण्याची मशीन शाॅर्टसर्किट झाल्यामुळे बंद पडली होती, तरी यासंदर्भात त्या विभागाच्या इलेक्ट्रेशन आॅपरेटरचे हे काम होते, राधिका कांबळे यांचे हे कामकाज नसताना त्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर ढकलून त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे, तसेच अधिकार्यांनकडून त्यांना जातीवाचक बोलून मानसिक त्रास दिला जात आहे, म्हणून यासंदर्भात सध्या त्यांची कोणतीही चूक नसताना व त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे, व त्यांची आठ तासाची ड्युटी असताना त्यांच्याकडून 12 तास काम करून घेतले जात होते, तरी राधिका कांबळे यांना तात्काळ कामावर रूजू करून घ्यावे व यात जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री सो यांना निवेदन देण्यात आले आहे व आठ ते दहा दिवसात त्यांना सन्मानाने कामावर रूजू करून न घेतल्यास बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Wednesday, 3 March 2021
Home
/
पंढरपूर
/
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या राधिका कांबळे यांना तात्काळ कामावर रूजू करून घ्या, बहुजन सत्यशोधक संघाचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री सो यांना निवेदन.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणार्या राधिका कांबळे यांना तात्काळ कामावर रूजू करून घ्या, बहुजन सत्यशोधक संघाचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री सो यांना निवेदन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment