Breaking

Monday, 22 March 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/प्रसाद दप्तरदार- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी भगीरथ भालके यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना निवेदन.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी भगीरथ भालके यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना निवेदन- याबाबत वृत्त असे की पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे नुकतेच निधन झाल्याने त्या जागेवरती पोटनिवडणुक जाहीर झाली आहे आणी अशातच पोटनिवडणुकीसाठी अनेकांकडून दावे केले जात आहेत आणी अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष भारत श्रीधर बेदरे यांनी परवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे पंढरपूर दौर्यावर आले असता त्यांना लेखी निवेदन देऊन पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी ही भगीरथ भालके यांनाच देण्यात यावी असे निवेदन अजित दादा पवार यांना बेदरे यांनी दिले आहे व भगीरथ भालके यांची युवा वर्गात क्रेझ असल्याने त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असेही यावेळी बेदरे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment