Breaking

Tuesday, 16 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ई.डी. एन.आय.ए. हे काही नवीन नाही.


“भा.ज.पा. विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ई.डी., एन.आय.ए. हे काही नवीन नाही”......
 
सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. 
दररोज नवीन घडामोडी समोर येत आहेत.
 भा.ज.पा.ने आक्रमक भूमिका घेत महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. 
तर, सचिन वाझे व हिरेन प्रकरणाचा तपास एन.आय.ए. व ए.टी.एस. करत आहे. 
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलातना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भा.ज.पा.वर जोरादार टीका केली. 
“भा.ज.पा. विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ई.डी., एन.आय.ए. हे काही नवीन नाही.  
सचिन वाझे प्रकरणाच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
भा.ज.पा. महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत आहे, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही.” असं यावेळी पटोले यांनी बोलून दाखवलं.
 सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत बोललं जात आहे यावर बोलताना पटोले म्हणाले, “कुणाला आयुक्त ठेवावं कुणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे.
 आय.पी.एस. अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्याकडे असतो आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील.” तर, 
 झालेल्या बैठकीबाबत माहिती सांगताना ते म्हणाले, “सर्व मुद्य्यांवर सविस्तर चर्चा झाली, महामंडळाच्या मुद्यावर देखील चर्चा झाली.
 यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडलेली आहे.
 याबाबत पूर्वीही वाद नव्हता व भविष्यातही राहणार नाही”. 
तसेच, वीजबिल प्रश्नाबाबत ऊर्जा विभागाकडून मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागण्यात आलेला आहे.
 त्यानंतर ताबडतोब निर्णय घेतला जाणार आहे, अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. 
मंत्रीमंडळातील खांदेपालटाबाबत कुठल्याही चर्चा सध्यातरी नाहीत ज्यावेळेस होईल तेव्हा आपल्याला कळेलच, असंही पटोले म्हणाले.

No comments:

Post a Comment