सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ.......
मे.सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामिनाची मागणी, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू असलेली चौकशी आणि साक्षीदारांनी दिलेले विरोधी जबाब या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात राज्य दहशतवादविरोधी पथक अटक करू शकेल, या शक्यतेने वाझे यांनी मे.ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला.
या अर्जावर निकाल होईपर्यंत अटक करू नये, अशी मागणी त्यात होती.
मात्र हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद करत ए.टी.एस.ने या अर्जास विरोध केला.
मे.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकू न तपास यंत्रणेकडे वाझे यांच्याविरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एन.आय.ए.) सकाळपासून वाझे यांच्याकडे चौकशी केली.
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एन.आय.ए.कडून सुरू आहे.
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेली स्कॉर्पिओ कार मनसुख यांच्या ताब्यात होती.
त्यामुळे मनसुख यांची हत्या आणि त्यांच्या कारची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एन.आय.ए.ने दोन दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली.
कुटुंबाला समोर ठेवत वाझे यांच्याकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
मनसुख यांची स्कॉर्पिओ चार महिने वाझे यांच्या ताब्यात होती, त्यांनी मनसुख यांना या प्रकरणात अटक होण्याबाबत सूचना आणि अन्य तपास यंत्रणांच्या चौकशीचा मनस्ताप होत असल्याबाबत तक्रार करण्याचा सल्ला वाझे यांनीच दिला होता, असा दावा हिरेन कुटुंबाने जबाबात केला आहे.


No comments:
Post a Comment