Breaking

Friday, 5 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी / मारूती सोमुत्ते- दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद.


दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद.....
 
कोल्हापुर ः दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी  जेरबंद केले. 
त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 
आरोपींकडे विनापरवाना पिस्तुल, चार राऊंड, दोन तलवारी अशी शस्त्रे आढळली. 
कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना, सायबर चौकातून एन.सी.सी. भवनकडे एक मोटार भरधाव वेगाने गेली. 
पोलिसांनी त्यांना थोड्या अंतरावर घेरले. 
वाहनाची पाहणी केली असता दोन तलवारी दिसून आल्या. 
त्यातील अजिंक्य मनोहर भोपळे (रा. मुंबई) याच्याकडे विनापरवाना पिस्तुल व चार राउंड देखील आढळले. 
याशिवाय कराड तालुक्यातील जयवंत सर्जेराव साळुंखे, दीपक जनार्दन आडगळे, अनिल आनंदा वायदंडे, वैभव दादासाहेब हजारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
संशयित आरोपी हे अभिलेखावरील गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत,असे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment