Breaking

Saturday, 6 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अंबानी प्रकरण, मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया.


अंबानी प्रकरण: 
मनसुख हिरेन यांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाल्या….....
 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. 
मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती.
 दरम्यान मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ते आत्महत्या करणं शक्य नसल्याचं सांगत पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये अशी विनंती केली आहे.
 “मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. 
आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती.
 पोलीस जेव्हा कधी फोन करायचे माझे पती चौकशीसाठी जात होते. 
पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. 
कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. 
१० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. 
कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता.
 ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला.
 आम्ही रात्रभर वाट पाहिली. 
सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” असं विमल हिरेन यांनी सांगितलं आहे.

  

No comments:

Post a Comment