देशात गाढवं नामशेष होण्याच्या मार्गावर ;
आरोग्यवर्धक असल्याचं सांगत ‘या’ राज्यात होतेय गाढवाच्या मांसाची विक्री.......
सामान्यपणे कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर दिसून येणारं गाढव हा नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
मात्र देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत गाढवाचा समावेश करण्यात आला आहे.
गाढवांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मागणी आहे.
या कारणामुळेही गाढवांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफ.एस.एस.ए.आय.) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरु शकत नाही.
गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचं आहे.
याचसंदर्भात आता आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरु असल्याचे वृत्त VBP NEWS ने दिले आहे.
आंध्रमधील काही ठिकाणी गाढवाचे मांस खाल्ल्याने कंबरदुखी, अस्थमा आणि श्वसनाच्या आजारासंदर्भातील व्याधींपासून आराम मिळतो असा समज आहे.
तसेच लैंगिकशक्ती वाढवण्यासाठीही गाढावाचे मांस फायद्याचे असल्याचे समजले जाते.
मात्र प्राणीमित्र म्हणून काम करणाऱ्या गोपाल आर. सुरबथुला यांनी आय. VBP NEWS सोबत बोलताना, “गाढवाचे मांस प्रकासम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यांमध्ये खाल्लं जातं.
दर गुरुवारी आणि रविवारी येथे गाढवाच्या मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
अनेक सुशिक्षित लोकंही हे मांस विकत घेताना दिसतात.
या मांसांसाठी आठवड्याला १०० हून अधिक गाढवांना ठार केलं जातं,” अशी माहिती दिली.


No comments:
Post a Comment