‘एक मार्चपासून दूध १०० रुपये लीटर’;
जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार......
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
दरम्यान या इंधनदरवाढीचा फटका दूधाच्या किंमतीलाही बसणार असून दुधाची किंमतही पेट्रोलप्रमाणेच १०० चा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
या ट्रेण्डअंतर्गत एक मार्चपासून दुधाची किंमत प्रति लीटर १०० रुपये होणार असल्याचा दावा केला जातोय.
संबंधित दिल्लीजवळील सिंघू सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी नेता मलकीत सिंह यांच्या हवाल्याने पत्रिका या हिंदी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
अशाप्रकारची कोणतीही बातमी आली आणि त्याची सोशल नेटवर्किंगवर चर्चा झाली नाही असं सामान्यपणे होत नाही.
याच बातमीचे वार्तंकन करण्यात आलेल्या पेपरचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
ट्विटरवरही या १०० रुपये लीटर दुधाची चांगलीच चर्चा आहे.


No comments:
Post a Comment