सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उस्मानाबादेतील मुख्याध्यापक एक हजाराची लाच घेताना चतुर्भुज- याबाबत सविस्तर वृत्त असे की उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहूराज दत्तू भोजगुडे, रा.समतानगर उस्मानाबाद यास एक हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून बेंबळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार यांचे Dcps परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना हे nps केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजना मध्ये वर्ग करण्यासाठी लोकसेवक नामे शाहूराज दत्तू भोजगुडे वय 54 वर्षे, व्यवसाय नोकरी, मुख्याध्यापक गांधी विद्यालय चिखली ता.जि.उस्मानाबाद, रा.समतानगर उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांना 1000/- रुपये लाच रकमेची मागणी करून 1000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली, या बाबत पोलिस स्टेशन बेंबळी जि.उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याकामी त्यांना पोलिस अंमलदार दिनकर उगलमूगले, अर्जुन मारकड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी किंवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद येथे संपर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि. उस्मानाबाद मो.नं.(9527943100 ) यांनी केले आहे.
Tuesday, 9 February 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment