Breaking

Wednesday, 24 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत ग्रामसंघ बांधणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.


मोडनिंब प्रतिनिधी / विनोद नागटिळक

मोडनिंब येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत ग्रामसंघ बांधणे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 

पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण शिबिर आज मोडनिंब येथील राजवाडा हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. हे शिबिर पाच दिवसांचे असून यामध्ये महिला सक्षमीकरण करणे, गट उद्योगा विषयी मार्गदर्शन करणे, गावपातळीवर महिलांचे संघटन बांधणी करून महिलांची स्वतंत्र संघटना तयार करणे., तसेच ग्रामसंघ तयार करून गाव पातळीवर तीन पदाधिकाऱ्यांची निवड करून ग्रामसंघ बांधणीसाठी मार्गदर्शन करणे. त्यामध्ये अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि  ग्राम संघाचे लिपिक म्हणजेच कर्मचारी असे चार पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून वर्धावरून सौ. पल्लवी अतुल कुत्तरमारे, सौ. संध्या नारायण उघडे, सौ. वर्षा श्रीकृष्ण चव्हाण व  BMSI IB सलोनी जगळे या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मोडनिंब येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ऊन्नती अभियान अंतर्गत ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षक म्हणून आले आहेत. या ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मोडनिंब येथील सौ.उज्वला स्वप्नील ओहोळ, (प्रतिक्षा महिला स्वयंसहायता समूह बचत गटाचे अध्यक्ष), व सौ. अक्षता निखिल निचाळ, (पंचशील महिला स्वयंसहाय्यता बचत गट अध्यक्ष) यांनी आयोजन केले आहे. या ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण शिबिरासाठी मोडनिंब येथील सौ. कोमल चांदणे,सौ. मोनिका खंदारे (शकुंतला साठे महिला स्वयं सहाय्यता बचत गट) सौ.  रूपाली खडके (प्रगती महिला स्वयं सहाय्यता बचत गट) सौ. मीरा वाघमोडे  (म्हाळसा महिला स्वयं सहाय्यता बचत गट) यांनी परिश्रम घेतले. तसेच 27 बचत गटाचे अध्यक्ष व सदस्य जवळपास 135 महिला उपस्थित होत्या. हे प्रशिक्षण पाच दिवस चालणार आहे.

या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून मा.श्री. भारत आबा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख उपस्थिती म्हणून  मोडनिंब ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच सौ. मीनाताई अनिल शिंदे व उपसरपंच श्री. दत्ता बापू सुर्वे, तसेच मोडनिंब ग्रामपंचायतीच्या नूतन महिला सदस्या सौ.लक्ष्मीताई पाटील, सौ. प्रमिलाताई खडके, सौ. शितल ताई मस्के, तसेच मोडनिंब ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री.  नागनाथ नाना ओहोळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन संतोष पाटील सर यांनी केले. तसेच मोडनिंब ग्रामपंचायतच्या  नूतन सरपंच सौ. मीनाताई अनिल शिंदे व उपसरपंच दत्ता बापू सुर्वे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मोडनिंब मधील सर्व महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment