Breaking

Thursday, 4 February 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- कौतुकास्पद, म्हणून हा भारतीय उद्योजक कर्मचार्यांच्या पत्नींनाही देणार पगार.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- कौतुकास्पद ! म्हणून ‘हा’ भारतीय उद्योजक कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही देणार पगार......
 
शारजामध्ये राहणारे भारतीय उद्योजक डॉ. सोहन रॉय यांनी एक अनोखा निर्णय घेतला असून आपल्या एरियस ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. 
गृहिणी म्हणून आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या घराची देखभाल करणाऱ्या महिलांना पगार देण्याचा निर्णय निर्णय रॉय यांनी घेतलाय. 
करोना साथीच्या कालावधीमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कंपनीसंदर्भात आणि आपल्या कामाबद्दल जो जिव्हाळा दाखवला आहे त्यामुळे रॉय प्रचंड प्रभावित झालेत. 
त्यामुळेच त्यांनी कर्मचाऱ्यांचं अनोख्या पद्धतीने कौतुक करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यामागे मे.भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं एक निरिक्षण कारणीभूत आहे.
 माहिती गोळा करण्याचं काम सुरु सध्या रॉय यांच्या कंपनीमधील व्यवस्थापनाकडून कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींची माहिती गोळा केली जात आहे. 
या माहिलांच्या पतीने किती वर्ष कंपनीमध्ये काम केलं आहे त्यानुसार या महिलांचा पगार निश्चित केला जाणार आहे. 
ही योजना कंपनी लवकरच अधिकृतरित्या लागू करणार असल्याचा वृत्त खलीज टाइम्सने दिलं आहे. 
कोणालाही कामावरुन काढलं नाही, ना पगारकपात केली मूळचे केरळचे असणारे एरियस ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी रॉय यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या कमावर खूपच खूश आहोत असं सांगितलं.
 सन २०२० मध्ये कठीण काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे ते पाहता आता त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना देण्याची वेळ आली आहे, असं रॉय सांगतात.

No comments:

Post a Comment