*महाराष्ट्र राज्य मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन राज्यसचिव पदी सुहास गायकवाड*
मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी हिंगणे खुर्द रामनगर येथील रहिवासी सुहास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक डॉक्टर सतीश केदारी यांनी दिले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी आमदार ॲड एल. टी. सावंत यांनी सुहास गायकवाड यांचे अभिनंदन केले.


No comments:
Post a Comment