Breaking

Wednesday, 24 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- आज पासून सोलापूरात 7 मार्च पर्यंत रात्रीची कडक संचारबंदी


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- आज पासून सोलापूरात 7 मार्च पर्यंत रात्रीची कडक संचारबंदी- याबाबत वृत्त असे की कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व कोराणाने राज्यात परत एकदा डोके वर काढल्याने रूग्णांची संख्या वरचेवर वाढतच आहे, त्याच अनुषंगाने व पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूरात आज मध्यरात्री पासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे, तसे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे व कोरोना चा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील टेस्टिंग ही वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच शाळा व महाविद्यालये हे 7 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत व 10 आणी 12 वीचे वर्गच फक्त सुरू राहतील, क्रिडांगणावर 7 मार्च पर्यंत कोणत्याही प्रकारच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार नाहीत असे त्यांनी सांगितले, लग्न समारंभासाठी फक्त 50 लोकांची मर्यादा असेल तसेच जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले व कर्नाटकातून सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यात येणार्या नागरिकांना कोरोना निगेटीव्ह प्रमाणात अनिवार्य असेल असे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment