Breaking

Thursday, 25 February 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार-सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या-या बाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून सर्वत्र रूग्णसंख्या वाढत आहे आणी प्रशासनावर याचा भरपूर प्रमाणात ताण पडत आहे व शासनाची तिजोरीवर देखील खूप मोठा बोजा पडलेला आहे, याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील होऊ घातलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, 250 पेक्षा जास्त सभासद असणार्या सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तसे आदेश महाराष्ट्र शासनाने काढले आहेत, ह्या सहकारी संस्थांच्या निवडणूका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशा प्रकारचे लेखी परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढले आहे.

No comments:

Post a Comment