Breaking

Thursday, 25 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- बांधकाम क्षेत्रातील मोठी बातमी, सोलापूरात युनिफाईड डिसिआर अंतर्गत 63 बांधकामांना मंजूरी.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- बांधकाम क्षेत्रातील मोठी बातमी 
सोलापूरात युनिफाईड डिसिआर अंतर्गत 63 बांधकामांना मंजूरी- याबाबत वृत्त असे की राज्य शासनाने घेतलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली च्या ऐतिहासिक निर्णयाची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी होत आहे सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत 63 बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये एकूण 39 इमारत बांधकामांना तर 24 इतर बांधकामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली युनिफाईड डीसी आर च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री श्री शिंदे राज्यातील सर्व जिल्ह्यात स्वतः जाऊन बैठका घेत आहेत 16 जानेवारी 2021 ला मंत्री श्री शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका नगर परिषद व नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी युनिफाईड डी सी आर बाबत सादरीकरण करण्यात आले व या निर्णयाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले मंत्री शिंदे म्हणाले की सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून युनिफाईड डी सी आरचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय राज्याच्या विकासात एकसूत्रीपणा आणून अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती मधील अक्कलकोट मधील चार इमारत बांधकामे बार्शी मध्ये आठ बांधकामे करमाळा मध्ये नऊ बांधकामे माढा मधील तीन इमारत बांधकामे मंगळवेढा मध्ये तीन बांधकामे मोहोळ मध्ये 14 इमारत बांधकामे पंढरपूर मध्ये पंधरा इमारत बांधकामे सांगोला मध्ये एक इमारत बांधकामे कुर्डूवाडी मध्ये चार बांधकामे व मैंदर्गी मधील दोन इमारत बांधकामांना युनिफाईड डी सी आर च्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे मुंबई वगळता संपूर्ण राज्यात युनिफाईड डीसी आर चा निर्णय लागू करण्यात आला आहे स्व वापरासाठी दीडशे चौरस मीटर पर्यंत घर बांधकामासाठी परवानगीची अट काढून टाकण्यात आली असून दीडशे चौरस मीटर ते तीनशे चौरस मीटर पर्यंत बांधकाम परवानगी साठी रीतसर अर्ज दाखल केल्यास दहा दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक आहे पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बांधकामांसाठी तीन एफ एस आय देण्यात आला असून कृषी पर्यटनात हॉटेल व फार्म हाऊस साठी पूर्वी 0.10% असणाऱ्या एफ एस आय मध्ये वाढ करून तो 1 एफ एस आय करण्यात आला आहे युनिफाईड डी सी आर च्या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्याचा समतोल विकास होणार असल्याचेही मंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment