Breaking

Tuesday, 9 February 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- महादेव गाडे यांच्या उपोषणाला यश, आष्टी गावातून कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर बंद करावे यासाठी कारवाई करण्याचे मोहोळ तहसीलदार यांचे आदेश.


VBP न्युज  नेटवर्क
औदुंबर रावजी पाटील साखर कारखाना लिमिटेड आष्टी (आष्टी खंडाळी रोड) कारखान्यावर जाणारे उसाचे ट्रॅक्टर गावांमधून कारखान्याकडे जातात ते ट्रॅक्टर तात्काळ बंद करावे यासाठीचे कारवाई करण्याचे आदेश मोहोळ तहसीलदार यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडी मोहोळ तालुका युवा अध्यक्ष महादेव आप्पा गाडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, मोहोळ तालुकाध्यक्ष पांडुरंग खांडेकर, माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तहसील कार्यालयासमोर आज दि. 08/02/2021रोजी औदुंबर रावजी पाटील साखर कारखाना लिमिटेड आष्टी(आष्टी  खंडाळी) रोड या कारखान्यावर जाणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर सरासरी 16 ते 18 टन ऊस ओव्हरलोड घेऊन आष्टी गावांमधून  कारखान्याकडे जातात ते गावांमधून जाणारे ट्रॅक्टर तात्काळ बंद करावेत, यासाठी मोहोळ तहसील कार्यालयासमोर आज आमरण उपोषणास बसले असता  त्यांचा वरील विषयाच्या उपोषणाचा 02/02/2021रोजीचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मोहोळ तहसीलदार साहेब यांनी  गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ व पोलीस निरीक्षक मोहोळ पोलिस स्टेशन यांना आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रत वंचित बहुजन आघाडी मोहोळ तालुका अध्यक्ष महादेव गाडे यांना देण्यात आलेली आहे व उपोषणा पासून परावृत्त केले आहे.

No comments:

Post a Comment