Breaking

Wednesday, 10 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब येथील एमआयडीसी साठी विशाल मेहता यांची पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचेकडे मागणी.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- मोडनिंब येथील एमआयडीसी साठी विशाल मेहता यांची पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचेकडे मागणी- याबाबत वृत्त असे की मोडनिंब ला एमआयडीसी होण्यासंदर्भात आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोडनिंब चे  उपसरपंच  विशाल मेहता हे गेल्या 3-4 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत, यामुळे लहान- मोठ्या उद्योगाला चालना मिळेल व तरूणांना ही रोजगार उपलब्ध होईल यासाठी विशाल मेहता हे एमआयडीसी ची मागणी करत आहेत आज विशाल मेहता यांनी पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांचेकडे एमआयडीसी होण्यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली, तसेच मोडनिंब मधील शिवाजीनगर येथील सिमेंट काँक्रीट रस्ता व हायमास्ट दिव्याच्या मंजुरी साठी निवेदन देण्यात आले यावेळी जि.प.सदस्य शंभूराजे मोरे, जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका अध्यक्ष कैलास दादा तोडकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment