Breaking

Wednesday, 17 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- बॅंक ऑफ महाराष्ट्र सह आणखी चार बॅंकाचे होणार खाजगीकरण.


बँक ऑफ महाराष्ट्रसह आणखी चार बँकाचे होणार खासगीकरण.....
नवी दिल्ली : केंद्र सरकार लवरकरच चार बँकांचे खासगीकरण करणार आहे. 
त्यात बँक ऑफ महाराष्ट्रासह चार बँकांचा समावेश आहे. 
पुढील ३-४ महिन्यात याची प्रक्रियाही सुरू होणार आहे.
केंद्र सरकार बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार बँकाचे खासगीकरण करणार आहे. 
केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात दोन बँकाच्या खासगीकरणाचे संकेत दिले होते. 
परंतु मोदी सरकार सराकरी बँकासाठे आग्रही आहेत. 
सध्या देशात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदात आणि कॅनरा या मोठ्या बँका असून बहुतांश बँकाचे विलगीकरण याच बँकांमध्ये झाले आहेत. 
एकूण २३ वेगवेळ्या बँका या मोठ्या सरकारी बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. 
त्यात देना बँक, अलाहबाद बँक आणि सिंडिकेट बँकेचा समावेश आहे.बँक ऑफ इंडियाचा देशात सहावा क्रमांक लागतो. 
तर सेंट्रल बँकेचा सातवा क्रमांक लागतो. त्यानंता इंडियन ओवरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 
बँक ऑफ इंडियाचे भांडवली मूल्य १९ हजार २६८ कोटी रुपये इतके आहे. 
तर इंडियन ओवरसीज बँकेचे मूल्य हे १८ हजार कोटी इतके आहे. 
महाराष्ट्र सहकारी बँकेचे मूल्य हे १० हजार ४४३ कोटी असून सेंट्रल बँकेचे मूल्य हे ८ हजार १९० कोटी रुपये इतके आहे.

No comments:

Post a Comment