Breaking

Sunday, 21 February 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अमरावती, अचलपुरमध्ये सात दिवसांसाठी लाॅकडाऊन.


अमरावती, अचलपुरमध्ये सात दिवसांसाठी ‘लॉकडाउन’......
 
राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. 
मुंबई, पुण्यासह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. 
या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. 
दरम्यान, अमरावती व अचलपुरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. 
जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी  पत्रकारपरिषदेत यशोमती ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. 
यावेळी पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्वांची उपस्थिती होती. 
 रात्री ८ वाजेपासून हा लॉकडाउन लागू करण्यात येणार आहे. 
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 
 “अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे 
ही बाब अतिशय गंभीर आहे 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका , आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी. तसेच नागरिकांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश  घेतलेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.” अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली.
 अमरावती जिल्हा तसेच शहरामध्ये गत काही दिवसांपासुन कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगर पालिका , आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या लक्ष केंद्रित करुन कार्यवाही करावी.

No comments:

Post a Comment