Breaking

Thursday, 25 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर-1500 स्क्वेअर फूटापर्यंत घर बांधण्यासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही...मंत्री एकनाथ शिंदे.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- 1500 स्क्वेअर फूटापर्यंत घर बांधण्यासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही....एकनाथ शिंदेची मोठी घोषणा- याबाबत वृत्त असे की आता राज्यात 1500 स्क्वेअर फूटापर्यंत घर बांधण्यासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे सध्या घर बांधण्याचा विचार करणार्या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे, ही घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे, ते सध्या औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते, यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी सांगितले की 31 डिसेंबर 2020 पर्यंत ची सर्व बांधकाम नियमित होतील त्याचबरोबर येथून पुढे जर पंधराशे स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचे असल्यास तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही नगर विकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोटे ग्राहकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे याचा फायदा राज्यातील 55 हजार कुटुंबांना होणार आहे या व्यतिरिक्त तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधणार यांसाठी दहा दिवसात परवानगी देणार देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे या व्यतिरिक्त राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल प्रकरणी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे राज्यात सध्या वीज बिल थकीत केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज खंडित करण्यात आले आहे याबाबत आपण मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांशी बोलणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे त्याचबरोबर त्यांनी या पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात विधान करणे टाळले आहे या घटनेची संपूर्ण माहिती मला नाही त्यामुळे पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच याबाबत बोलेल असेही त्यांनी म्हटले आहे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात शिवसेनेच्या संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे हा मुद्दा संवेदनशील असून यावर आत्ताच काही विधान करणे उचित ठरणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment