Breaking

Friday, 4 December 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची भालके कुटूंबियांना सांत्वनपर भेट.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- नाना पटोले यांची भालके कुटूंबियांना सांत्वनपर भेट- याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन झाले आहे तरी सर्व जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे, त्यातच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे पंढरपूर दौर्यावर आले असता त्यांनी प्रथम पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर पंढरपूर मधील वारकरी संप्रदाया सोबत महाराज मंडळींची आळंदी यात्रा संदर्भात बैठक घेतली त्यानंतर ते नुकतेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन झाल्याने त्यांच्या सरकोली येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेले त्यांच्या  निवासस्थानी जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते भगीरथ दादा भालके यांची भेट घेऊन भालके कुटुंबीयांचे सांत्वन केले व युवा नेते भगीरथ दादा भालके यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत अडचणीच्या वेळी त्यांना मदत करण्याचे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

No comments:

Post a Comment