सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - कोणत्याही बॅंकेला लंच टाईम नसतो- याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रत्येक बँकेसाठी प्रत्येक ग्राहक हा महत्त्वाचा असून तो बँकेच्या वेळेत बँकेमध्ये कधीही येऊ शकतो बँक अधिकारी त्याला लंच टाईम असल्याचे सांगून टाळू शकत नाहीत अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे एका व्यक्तीने माहिती अधिकाराच्या माध्यमातून बँकेशी निगडीत प्रश्नांची उत्तरे रिझर्व्ह बँकेला मागितली होती.
उत्तराखंडमधील हल्दवानी चे उद्योजक प्रमोद गोल्डी यांनी we're ही माहितीच्या अधिकाराखाली रिझर्व्ह बँकेकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती.
सकाळी दहा 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विना थांबता सेवा देणे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित आहे अधिकारी बदलून त्या जागी दुसरा अधिकारी नेमून जेवायला जाऊ शकतात पैशाची देवाणघेवाण त्यावेळी सुरू असावी.
कॅश काउंटर बंद नसतात.
जेवणासाठी वेळ सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवता येत नाही काउंटरवर ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमी कोणीतरी असावे लागते. 1111 किंवा 2222 अशी रक्कम बँक ठेवी मध्ये जमा करण्यास कोणतीही बँक नकार देऊ शकत नाही ठेवी स्वीकारणे संबंधी अशा कुठल्याही मार्गदर्शक बाबी नाहीत.
धनादेश स्वीकारण्यास कुठल्याही प्रकारचा विलंब झाल्यास ग्राहकांना बँकेकडून भरपाई मिळवण्याचा अधिकार आहे. ग्राहकाच्या खात्यातून अनधिकृत व्यवहारांसाठी बँक ग्राहकांना जबाबदार ठरवू शकत नाही. कायमस्वरूपी पत्ता असल्याशिवाय खाते उघडता येणार नाही असे कोणतीही बँक सांगू शकत नाही. ग्राहकांची वैयक्तिक माहिती हे गुप्त ठेवणे ही बँकेची जबाबदारी आहे. बँकेला इतर कोणत्याही व्यक्तीला त्यासंदर्भात माहिती देता येत नाही.


No comments:
Post a Comment