संपादकीय/ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना हवा असणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ- आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन या निमित्त प्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन.
भारताची राज्यघटना लिहीत असताना मला फारसे कष्ट पडले नाही कारण माझ्या समोर उभे होते ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे वाक्य आहे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतीराव फुले यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवत असत.
आणी राज्यघटना लिहीत असताना त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले हक्क, मूलभूत अधिकार, विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण, नोकरी इत्यादी अधिकार आपल्याला बाबासाहेबांचीच देण आहे.
राज्यघटना लिहीत असताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' पत्रकार " हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे संबोधले आहे. किती मोठी दूरदृष्टी होती बाबासाहेबांकडे, त्यांना माहीती होती की देशाच्या विकासासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी पत्रकार हे महत्वपूर्ण भूमिका मांडण्यासाठी किती उपयुक्त ठरतील म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असा उल्लेख केलेला आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी प्रेरित असलेला पत्रकार तयार झाला पाहिजे, खरे काय आहे नि खोटे काय आहे पत्रकाराने जाणले पाहीजे.
पत्रकाराने समाज हित डोळ्यासमोर ठेवूनच काम केले पाहिजे. अनेकांवरती अन्याय होतात , त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, समाजहित, देशहित, राष्ट्रचा विकास साधण्यासाठी पत्रकार हेच महत्वपूर्ण भूमिका मांडण्यासाठी उपयुक्त असतात.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दूरदृष्टी होती म्हणून त्यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे संबोधले आहे, परंतु बाबासाहेबांच्या हृदयदयातला पत्रकार होण्यासाठी त्या पत्रकाराला समाजहितासाठी, देशहितासाठी खरे आपल्या लेखणीला धार द्यावी लागणार आहे तरच समाजाची उन्नती होईल व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील तो लोकशाहीचा चौथा स्तंभ खर्या अर्थाने उदयास येईल व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना हेच खरे अभिवादन ठरेल.


No comments:
Post a Comment