सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- वरवडे टोलनाक्याजवळ वाहतूक पोलीसाच्या अंगावर घातला टेम्पो, पोलीसाचा जागीच मृत्यू - या बाबत सविस्तर वृत्त असे की पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाक्यावर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलीसाच्या अंगावर मद्यधुंद टेम्पो चालकाने टेम्पो घातल्यामुळे पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना साडे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. सागर औदुंबर चोबे वय 34 असे त्या मृत झालेल्या वाहतूक पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक नागनाथ शिवाजी गुटे ( रा.परळी वैजनाथ) या टेम्पो चालकास टेंभूर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेडिसिनचे साहित्य घेऊन हैद्राबाद हून पुण्याकडे टेम्पो ( क्रमांक एमएच.04.एचडी. 0170) चालला होता, दरम्यान वरवडे टोलनाक्याजवळ बंदोबस्तासाठी थांबलेल्या वाहतूक पोलिस चोबे यांनी टेम्पो चालकाला थांबवण्याचा इशारा केला मात्र दारू पिऊन तराट स्थितीत असलेल्या टेम्पो चालकाने डायरेक्ट चोबे यांच्या अंगावर टेम्पो घातला. यात चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच टेम्पो चालक पळून चालला होता परंतु अपघात घडलेल्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या वैभव गायकवाड ,स्वप्निल तळेकर, गणेश गायकवाड, उमेश भोसले, तरूणांनी चालकाला पकडले तसेच चोबे यांना रुग्णवाहिकेतून रूग्णालयात पाठवून माणूसकीचे दर्शन घडवले, मयत सागर चोबे हे मोडनिंब वाहतूक पोलिस दलात कार्यरत होते.
Sunday, 6 December 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - वरवडे टोलनाक्याजवळ वाहतूक पोलीसाच्या अंगावर घातला टेम्पो, पोलीसाचा जागीच मृत्यू.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - वरवडे टोलनाक्याजवळ वाहतूक पोलीसाच्या अंगावर घातला टेम्पो, पोलीसाचा जागीच मृत्यू.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment