मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- ग्रामपंचायतीमधील अपहाराप्रकरणी सिद्धार्थ शेंडगे यांचा आत्मदहनाचा इशारा- याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे यांनी मोडनिंब ग्रामपंचायतीमधील अपहाराप्रकरणी बर्याच वेळा चौकशीची मागणी केली होती परंतु त्यांना न्याय मिळत नाही असे त्यांचे म्हणणे आहे व प्रत्येक चौकशी प्रकरणात अधिकारी हे सरपंच, ग्रामसेवक यांच्या हिताचेच अहवाल तयार करून देतात असेही शेंडगे यांचे म्हणणे आहे व बोगस दलित वस्ती प्रकरण, निकृष्ठ दर्जाचे रस्ते, भ्रष्टाचार इ संबंधी शेंडगे यांनी चौकशीची मागणी करून त्यांना न्याय मिळत नसल्याने,मोडनिंब ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ आप्पा शेंडगे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेंडगे यांनी मोडनिंब मधील दोन माजी व एक विद्यमान सरपंच यांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार केला असून त्यामध्ये तत्कालीन व विद्यमान ग्रामसेवकांचाही सहभाग असून त्यांची संपूर्ण चौकशी करावी व कारवाई करण्यात यावी यासाठी त्यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक व इतर अधिकार्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात जर का दोषींवर कारवाई केली नाही तर दि.10 डिसेंबर 2020 रोजी मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे शेंडगे यांनी म्हंटले आहे.
Saturday, 5 December 2020
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचारा संबंधी सिद्धार्थ शेंडगे यांचा आत्मदहनाचा इशारा.
मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- ग्रामपंचायती मधील भ्रष्टाचारा संबंधी सिद्धार्थ शेंडगे यांचा आत्मदहनाचा इशारा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment