सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मा.जिल्हा मार्केटिंग सोलापूर सबएजंट कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी यांचेकडे.माढा यांच्या संयुक्तपणे आधारभूत किंमत व मका खरेदी केंद्र सन 2020-21 चे दि.30/11/2020 रोजी बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील यांच्या हस्ते कुर्डूवाडी येथे संपन्न- याबाबत सविस्तर वृत्त असे की मा.जिल्हा मार्केटिंग सोलापूर सबएजंट कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी ता.माढा यांच्या संयुक्तपणे आधारभूत किंमत 1850/- आधारभूत मका खरेदी केंद्र सन 2020-21 चे दि.30/11/2020 रोजी बाजार समितीचे उपसभापती सुहास काका पाटील जामगावकर यांच्या हस्ते मुख्ययार्ड कुर्डूवाडी येथे संपन्न झाले.
यावेळी बाजार समितीचे संचालक मा.सुरेश बागल, मा.संदीप भोसले, तहसिलचे प्रतिनिधी थोरात साहेब, माढेश्वरी बॅंकेचे संचालक गणेश काशीद सर, व बाजार समितीचे प्र.सचिव मा.अजिनाथ बोंगाळे साहेब, सर्व कर्मचारी, शेतकरी बांधव व हमाल तोलार उपस्थित होते.
सदरच्या मका हमीभाव केंद्रावर प्रति हेक्टरी 19 क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. तरी नाव नोंदणी केलेल्या शेतकरी यांनी online sms आल्यानंतर मका चाळणी, स्वच्छ व चांगल्या प्रतिची आद्रता 14% च्या आत असेल तर मका विक्री साठी आणावी असे आवाहन बा.स.चे प्र.सचिव मा.बोंगाळे साहेब यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment