Breaking

Tuesday, 1 December 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये कचरा उघड्यावरच टाकला जातो.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंब वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये कचरा उघड्यावरच टाकला जातो- मोडनिंब वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये सुनिल कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेतच तेथील राहीवाशी मोकळ्या जागेतच कचरा टाकत असून तेथे कचरा कुंडी ठेवण्याची नितांत गरज आहे. 





दाट वस्ती असलेला हा प्रभाग असून कचरा कुंडी नसल्याने तेथील नागरिक हे मोकळ्या असलेल्या जागेतच कचरा टाकत आहेत यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे व यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे व यामुळे तेथील नागरिकांना याचा खूप त्रास होतो आहे गरज आहे ती प्रशासनाने यात वेळीच लक्ष देऊन तेथे कचरा कुंडी ठेवण्याची व नागरिकांनीही उघड्यावर कचरा न टाकता तो कचरा कुंडी ठेवल्यानंतर कचरा कुंडीतच टाकला पाहिजे.

No comments:

Post a Comment