पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात दिंड्या, पालखींना प्रवेश बंदी- याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाने विविध जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना कार्तिकी वारी निमित्त पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका असे आदेश दिले आहेत. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी वारीला पंढरपूर मध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबर ला आहे. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशी दिवशी पंढरपूर व परिसरातील 8-10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
कार्तिकी एकादशी साठी महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने पंढरपूरात दिंड्या, पालख्या येत असतात. राज्य सरकारने या सर्व सोहळ्यांना बंदी घातली आहे. कोरोना संसर्गामुळे आषाडी यात्रेनंतर कार्तिकी वारी ही निर्बंधातच होणार आहे.
*पंढरपूरसह परिसरातील गावांमध्ये* *संचारबंदी*
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर शहरासह परिसरातील आठ ते दहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा बंद राहणार आहेत.25 आणी 26 नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पंढरपूर मध्ये येणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 22ते26 नोव्हेंबर रोजी बाहेर गावातून पंढरपूर कडे येणारी सर्व एसटी वाहतूक बंद राहणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये न येण्याचे आवाहन वारकर्यांना प्रशासनाने केले आहे.
कार्तिकी एकादशी च्या निमित्ताने प्रशासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहीती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
*कोरोनाच्या येणार्या दुसर्या लाटेची भिती*
देशात कोरोना संसर्ग अजून आटोक्यात आला नाही. अशातच कोरोना ची दुसरी लाट येण्याची भिती आरोग्य संस्थांनी व्यक्त केली आहे. 26 नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी आहे. आषाढी नंतर भरणारी ही मोठी वारी आहे. मात्र यात्रेत गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशी प्रमाणे कार्तिकी यात्रा सुद्धा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी. तसेच आषाढी यात्रा पद्धतीने नियम असावेत असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. भाविकांनी मात्र कार्तिकी यात्रा रद्द न करता कोविड चे नियम घालून यात्रा करावी अशी मागणी केली होती.
वारकर्यांनी काही दिवसांपूर्वी कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. दरम्यान मार्च महिन्यापासून लाॅकडाऊनमुळे बंद असलेली धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. राज्यातील मंदीर 16 नोव्हेंबर पासून उघडण्यात आली होती.


No comments:
Post a Comment