Breaking

Sunday, 22 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- वारकर्यांना वारी नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये....वारकरी संप्रदाय.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- वारकर्यांना वारी नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये....वारकरी संप्रदाय- याबाबत सविस्तर वृत्त असे की कार्तिकी यात्रा निमित्त वारकर्यांना पंढरपूर मध्ये येण्यास निर्बंध घातले आहेत. वारकर्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री कार्तिकीची वारीची शासकीय महापूजा कसे करतील. हा भेदभाव शासनाने करू नये वारकर्यांना वारी नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी





करू नये असे आवाहन ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी केले आहे. कार्तिकी यात्रा संदर्भात वारकर्यांची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राणा महाराज वासकर,भागवत महाराज चवरे, विष्णू महाराज कबीर,मनोहर महाराज बेलापूरकर, रंखनाथ महाराज राशनकर,जगन्नाथ महाराज देशमुख, देवीदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उखळीकर, व अन्य महाराज उपस्थित होते. 






या अनुषंगाने कार्तिकी यात्रा समन्वय समितीने पुढे होणार्या सर्व निवडणूक मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. व त्याची सुरूवात येणार्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकून करण्यात येणार आहे. 






त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला एवढे निर्बंध असतील तर कार्तिकी एकादशीच्या महापूजेला बाहेरून कोणी न येता ही महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करावी असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment