Breaking

Friday, 20 November 2020

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ शेतकर्याच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला.


महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ शेतकर्याच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला- याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंगोली मधील औंढा नागनाथ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पद्यावती शिवारात एका शेतकर्यावर कुर्हाडीने वार करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 





रवी वाठ असं या मृत शेतकर्याचे नाव आहे, पोलिस या हत्येचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवी गुरूवारी रात्री शेतीला पाणी देण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांनी कुर्हाडीने हल्ला केला.





त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह जवळ असलेल्या विहिरीत फेकून हल्लेखोर पसार झाले, त्यानंतर पहाटे शेजारील शेतकरी विहिरीजवळ गेले असता, त्यांना रवी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. 





त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना माहीती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान पोलिसांनी पहाटे सहा वाजल्यापासून मारेकर्यांचा शोध सुरू केला आहे. जमादार आफसर खान पठान यांनी पंचनामा केला असून, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता, तसेच लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध लावण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment