Breaking

Monday, 30 November 2020

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके- जखमी मुलीस उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलेबाबत...पोलिस प्रशासनाचे मानले आभार.


मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-जखमी मुलीस उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलेबाबत-
जखमी मुलीस तात्काळ उपचार कामी रुग्णालयात दाखल केले बाबत. 25 नोव्हेंबर रोजी भायखळा रेल्वे स्टेशन येथे दुपारी १२.२५ वाजता फलाट क्रमांक २ वर आलेल्या  डाऊन लोकलचे महिलांचे दुसरे वर्गाचे डब्यातून एक १२ वर्षाची मुलगी नामे कु. अनम असिफ अन्सारी, रा. मदानपुरा, ही लोकल फलाटावर पूर्णपणे थांबण्या आधीच लोकल मधून उतरण्याच्या प्रयत्नात ती लोकल मधून फलाट क्रमांक २ येथे पडली व बेशुद्ध झाली.






          त्याच वेळी तेथे कर्तव्यास हजर असलेले महिला पोलीस हवालदार/१७३ मंदाकिनी माने व पोलीस अंमलदार/९३९ जयवंत वाकडे यांनी तत्परतेने सदर मुलीस स्वतःच्या हातावर उचलून अँबुलन्सची वाट न बघता तात्काळ टँक्सिने J J रुग्णालयात अधिक उपचार कामी दाखल केले. तेथे ऑन ड्युटी डॉक्टरांनी मुलीवर उपचार करून तिला शुद्धीवर आणले, जखमी मुलीचे हाताचे कोपरास खरचटले असून डोक्यास मागे मुका मार लागलेला आहे. त्यावेळेस त्या जखमी मुली समवेत तिची आई नामे समीरा असिफ अन्सारी, वय - ३२ वर्ष, रा. मदानपुरा, मुंबई, या बरोबर होत्या. मुलीला डिस्चार्ज दिले नंतर तिचे आईचे ताब्यात देण्यात आलेले आहे.





            पोलीस अंमलदार मंदाकिनी माने व जयवंत वाकडे यांनी दाखविलेल्या तत्परतेचे J J रुग्णालयातील ऑन ड्युटी डॉक्टरनी दखल घेऊन मुलीला वेळीच रुग्णालयात आणल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले व मुलीच्या आईने वरील दोन्ही पोलीस अमलदारांचे व रेल्वे पोलिसांचे आभार मानलेले आहेत.

No comments:

Post a Comment