सातारा जिल्हा प्रतिनिधी/मारूती सोमुत्ते-
कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार ठार-
वहागाव ( ता कराड) पुणे बंगळूर महामार्गावर बेलवडे हवेली ता.कराड गावच्या हद्दीत दुचाकीला कुत्र्याची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली.
गौतम सिताराम रोकडे ( वय 66) सध्या रा तासवडे midc ता कराड (मूळ रा उपळावी सांगली ) असे जागीच ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत घटना स्थळावरील मिळालेली माहितीनुसार गौतम रोकडे (MH 10 BN 0883 ) वरून तासवडे औद्योगिक वसाहतीतुन कराड ला येत असताना बेलवडे गावच्या हद्दीत आले असता अचानक दुचाकीला कुत्र्याची धडक बसली असता रोकडे दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीररीत्या जखमी झाले व ते जागीच ठार झाले.


No comments:
Post a Comment