Breaking

Sunday, 29 November 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- मोडनिंबच्या विकासासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज....दीपक आबा सुर्वे.


मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे-मोडनिंबच्या विकासासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज...दीपक आबा सुर्वे- याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या मोडनिंब येथील ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने व प्रशासक नियुक्ती झाल्याने मोडनिंब मध्ये राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे.





राजकीय नेते मंडळी व स्थानिक राजकीय आघाड्यांचे बैठकांचे सत्र सुरूच आहे. मोडनिंब येथील युवा शक्ती विकास आघाडीची ग्रामपंचायत लढवण्याबाबत व पुढील धोरण ठरविण्याबाबत एक महत्वपूर्ण बैठक मागील आठवड्यात ओंकार पॅलेस येथे पार पडली या बैठकीत राजकीय, विकासात्मक धोरणाबद्दल चर्चा झाल्याचे समजते आहे. 





युवा शक्ती विकास आघाडीचे उमेदवार कोण कोण असावेत, त्याचबरोबर तरूणांना अधिकाधीक संधी देण्यात यावी असेही या बैठकीत ठरल्याचे समजते व या बैठकीत बोलताना दीपक आबा सुर्वे यांनी मोडनिंब मधील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन विकासात्मक दृष्टीने ही निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त केला व सर्व विरोधकांना मोडनिंब च्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन दिपक आबा सुर्वे यांनी केले आहे व आजपर्यंत एक सरपंच वगळता कोणीही विकास केलेला नाही सर्वांनी आपल्याच पोळीवर दाळ ओढण्याचे काम केले असून हे मोडनिंब च्या दृष्टीने घातक असल्याचे मत दीपक आबा सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. 




या युवा शक्ती विकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत धनाजी भाऊ लादे, धनंजय महाडिक,विजयकुमार परबत, सिद्धार्थ आप्पा शेंडगे, उल्हास जाधव, स्वाधीन थोरात, अक्षय खंदारे,जावेद पठाण, गणेश कोळी, लक्ष्मीकांत खंदारे, गजानन सुर्वे, संतोष कसबे,चंद्रकांत लोकरे,गोपाळ जवंजाळ व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment