Breaking

Tuesday, 16 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांवर दबाव...देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.


पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पोलिसांवर दबाव!
देवेंद्र फडणवीस यांचा आरोप......

 नागपूर : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून गुन्हा दाखल झाला पाहिजे. 
पण पोलीस तपासात प्रगती दिसत नाही. 
यामुळे पोलीस दबावात आहेत का ?, याप्रकरणी सत्य समोर आले पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 
एखाद्या मंत्र्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये अशा पद्धतीने विरोधकांनी आरोप करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. 
यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. 
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घेतल्यास कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हे लक्षात येईल. 
मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन चौकशी होऊ शकत नाही.
 पण सत्य समोर आले पाहिजे. 
या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे हे सगळ्यांना माहीत आहे. 
पोलिसांनीही ते सांगण्याची गरज आहे. 
पण पोलिसांकडून तथ्य लपवले जात आहे.
 या प्रकरणात पोलीस दबावात आहेत हे स्पष्ट दिसते. 
याप्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तपास पुढे सरकणार नाही. 
याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
 चंद्रकांत पाटील आपल्या गावातून दुसऱ्या गावात आले तरी निवडून आलेत.
 आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते कुठूनही निवडून येऊ शकतात हे महत्त्वाचे आहे, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्या विधानावर केली. 

विरोधकांचे आरोप चुकीचे,
 थोरात......

 या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. 
राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून होत आहे. 
पोलीस तपासात सत्य समोर येईल. 
पोलीस दबावात काम करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

No comments:

Post a Comment