Breaking

Thursday, 19 November 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/सतिश निंबाळकर - मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. काटकर साहेब यांनी दलित वस्ती संदर्भात मोडनिंब चे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांना दिली माहिती, शिवाजीराजेंचा आत्मदहनाचा निर्णय मागे.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर-मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. काटकर भाऊसाहेबांनी मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांना दलित वस्ती संदर्भात दिली माहिती, शिवाजीराजेंचा आत्मदहनाचा निर्णय मागे- याबाबत सविस्तर वृत्त असे की दोनच दिवसांपूर्वी मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांनी दलित वस्ती संदर्भात मोडनिंब ग्रामपंचायतीला अर्ज देऊन 2011 च्या लोकसंख्येवरून अस्तित्वात असलेल्या 35 दलित वस्त्यांपैकी कोणती वस्ती कोणत्या प्रभागात येते व त्या वस्तीचे नाव, तेथील लोकसंख्या, व सांकेतांक मिळावा म्हणून त्यांनी मोडनिंब ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता.






व दि.20/11/2020 पर्यंत माहीती न दिल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, या प्रकरणाची दखल घेत अखेर मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. काटकर साहेब यांनी दलित वस्ती संदर्भात सर्व माहिती मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांना माहीती दिली आहे अशी माहीती स्वतः शिवाजीराजे सुर्वे यांनी VBP NEWS सोबत बोलताना दिली आहे व माहीती मिळाल्याने मी आत्मदहनाचा दिलेला इशारा मागे घेत आहे असे शिवाजीराजे सुर्वे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment