सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ,मतदार यादीतील नाव,पत्ता दुरूस्ती करायचीय संधी मिळणार - याबाबत सविस्तर वृत्त असे की
सोलापूर - भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. यामुळे मतदार यादीतील नाव,पत्ता आदी दुरूस्ती करण्याची संधी मिळणार आहे.
1 जानेवारी 2021 अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार याद्या मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार याद्यांप्रमाणे नावे नसलेले मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरूस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास दावे आणी हरकती 15 डिसेंबर 2020 पर्यंत प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी (ई आर ओ) यांच्या कार्यालयात स्विकारल्या जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे.
दावे, हरकती निकाली काढण्याची मुदत 05 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणी पुरवणी याद्यांची छपाई 14 जानेवारी 2021 पर्यंत करून 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.
पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान दोन शनिवार आणी दोन रविवारी प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष मोहीमेचे ( स्पेशल कॅम्पेन) आयोजनही करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पूर्वीच्या मतदार यादीतील मरण पावलेल्या, स्थलांतरित झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत, अशा वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवणार येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची ( बूथ लेव्हल आॅफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले आहे. आॅनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


No comments:
Post a Comment