सातारा जिल्हा प्रतिनिधी/मारूती सोमुत्ते-शर्यत दुष्काळा विरुध्द लढण्याची
माणदेशी मॅरॅथाॅन ( वाॅटर) स्पर्धा -
सातारा जिल्ह्यातील माणतालुक्यात प्रथमच माणदेशी मॅरॅथाॅन (वाॅटर ) हि स्पर्धा 1/12/2019 रोजी आयोजित करण्यात आली होती ,, हि स्पर्धा दुष्काळ निवारण निधी याकरिता आयोजित करण्यात आली होती. साधारण..3000 बाहेरच्या स्पर्धकांनी उस्फूर्त पणे भाग घेतला होता ,, ह्या गोष्टीची काणकुण रोहितच्या कानावर पडली ??
"पप्पा काहिही करून या मॅरॅथाॅन मध्ये मला स्पर्धेत उतरवा . मला पळायचे आहे. मला जिंकायचे आहे. हि स्पर्धा दुष्काळाविरूद्ध पाण्यासाठी आहे ,
रोहित 21 किलोमीटर धावायचे आहे .हे काय खायाचे काम नाही . तु शाळेतील मैदानात कधी जिंकला नाही, ना कधी एकादी कुस्ती मारली नाही .आणि तुझं वजन 73 किलो कशाला इज्जत घालवून घेतोस?
म्हणूनच या स्पर्धेत मला धावायचे आहे ,,,,
,,हौसला बुलंद द्रुढ आत्मविश्वास प्रचंड इच्छाशक्ती पण मैदानातली खरी सत्त्वपरीक्षा आव्हानात्मक कठीण होती.....
रात्री उशिरापर्यंत युट्यूब वर (अनोरमा )व नितीन भानगुडे पाटलांचे भाषण व तानाजी मालुसरे यांच्या जिवनावरील प्रेरणादाई शूरवीर पराक्रमी धैर्य शौर्य ऐतिहासीक गोष्टी पाहील्या .......
जिंकायला मोठं वाघाचं काळीज लागतं ,,,झाले तर नाव नाहीतर (झीरो ),,,,जिंकायचे फक्त जिंकायचे एवढी ठानगाट मणाशी बांधून हा पठ्ठ्या मैदानात उतरला ... समोरच आयुक्त डॉ नामदेव भोसले त्यांचे शब्द मज्याच मज्या हि धूण काणावर पडत होती .काही क्षणातच ,,धाव सुरू झाली ,,
धावायला सुरुवात झाली तेवड्यातच चार किलोमीटरवर रोहित चा बुट फाटला एका पायाच्या बोटावर फोड येउन फुटला ,,रक्तभंबाळ पायाने दुखण्याच्या कळा गप्प गीळून हासऱ्या चेहऱ्याने हा पठ्ठ्या धावायला लागला ,,,इतिहासातील अनेक पात्रं डोळयासमोर येत होती मी एखाद्या पराक्रमाला निघालोय जणू थोर शुरवीरांचे रक्त आंगात सळसळतय ,,आता मागार नाही आता रडायचं नाही भिडायचे ,, डोळ्यासमोर दिसत होते ते फक्त लक्ष गाठण्यासाठी हळुहळू आंतर कापत सगळं आवसान एकवटून दमदार रपतार पकडून एक एक टप्पा पार करत होता हा पठ्ठ्या ,,,
पाठीमागून एक लहान आवाजातील किंकाळी
दादया पळ
दादया पळ.........................................आशी म्हणत रक्षीता रोहीतला प्रोत्साहन देण्यासाठी ओरडत तीही तावानं धावत होती रोहित गळाटला की फक्त ...दादया तुला जिंकायचे आहे . लय अपमान आजपर्यंत आपण सहन केले आहेत , आता हारू नको जिंकायचे आहे तुला , आसा हौसला वाढवत रक्षीताही सावलीसारखी पाठिशी भक्कम पोटतिडकीने रोहितबरोबर रुडावली होती ....
अखेर( दोन तास वीस मिनिटाच्या ) संघर्षमय अथक प्रयत्नांच्या पराकष्टाने 21 कि ,मि, आंतर धाऊन विजय मिळवला ,,, धावत येनाऱ्या रोहीतला बापाने मिठी मारली,, पहिल्यांदाच विश्वास न बसनारा पराक्रम बापाने पाहिला होता ,, हे रे वाघ म्हणत बापाचंही काळीज डोंगराऐवढे झाले ,,
स्पर्धेत नाव नोंदणी केली नसल्याने संयोजकांनी कींवा कुणीही दखल घेण्याचा प्रश्न च नव्हता..
तेवड्यात.गर्दीच्या पलिकडे माणदेशी एक्सप्रेस आंतरराष्ट्रीय धावपटू सौ ललिता बाबर व सौ.आनुराधा देशमुख काकी यांनी आम्हाला पाहिले विशेष म्हणजे,,,, साऱ्या रस्त्यावर रक्षीता पळ रोहित पळ आशी हाका मारनाऱ्या बापाला सौ.ललिता ताईंनी पाहिले होते,,,रोहीतची पळण्याची तळमळ रक्षीताचा आक्रोश जिद्दी भावंडं ,,त्यांच्यातील खरी आत्मिकता संपूर्ण रस्त्यावरचा संघर्ष सौ.ललिता ताईंच्या निदर्शनास आला होता ,,
शाब्बास ......रोहित रक्षीता तुम्ही दुष्काळ मुक्ती साठी लढनारी भावंडं आहात .... आनेकांनसाठी तुम्ही प्रेरनादाई आहात ,, ताई आम्ही पळालो खरे पण या स्पर्धेत आमचे नाव नाही , पाणावलेल्या डोळ्यांनी वाघासारखी छाती फुगवून सांगनाऱ्या रोहितच्या गळ्यात सौ.ललिताताईंनी स्वःताच्या गळ्यातील गोल्डमेडल रोहितच्या गळ्यात घालून शाब्बासकीची थाप पाठिवर दिली,, तुझ्या सारख्या युवकांची देशाला गरज आहे,
हि गोष्ट आहे स्पर्धेत भाग घेतला नसताना 21 किलोमीटर ची धाव फक्त दुष्काळ मुक्तीसाठीसाठी पुर्ण करनाऱ्या जलयोद्धयाची ,,,


No comments:
Post a Comment