Breaking

Monday, 30 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- आ.भारत नाना भालके यांना रक्षाविसर्जन कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-आ.भारत नाना भालके यांना रक्षाविसर्जन कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण- याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार स्व. भारतनाना भालके यांना मा.ना जयंत पाटील साहेब, मंत्री,जलसंपदा यांनी रक्षाविसर्जन कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केली. नाना गेले याच्यावर विश्वास बसत नाही. एक धडाडीचा नेता, काम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे व्यक्तिमत्व अशी नानांची ओळख. त्यांच्या निधनाने पक्षाचे आणि पंढरपूर -मंगळवेढ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

विठ्ठल साखर कारखाना सुरु करण्यासाठी नानांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यासाठी सतत ते पाठपुरावा करत असत. माझ्या शेतकरी बांधवांचं, कामगारांचं नुकसान होऊ नये अशी नानांची भूमिका होती. मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून मंगळवेढ्यातील ३५ गावांना पाणी मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. 

विठ्ठल साखर कारखान्यास आर्थिक संकटातून काढणे तसेच आगामी वर्ष-दीड वर्षात मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त ३५ गावांना पाणी देणे हीच नानांना खरी श्रद्धांजली ठरेल. आदरणीय पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून ही दोन्ही कामे मार्गी लावण्याची ग्वाही पाटील साहेबांनी दिली.

No comments:

Post a Comment