Breaking

Monday, 2 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया देवास दुग्धाभिषेक.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया देवास दुग्धाभिषेक

आमदार भारत भालके यांना कोरोणा झाल्यामुळे हुलजंती तालुका मंगळवेढा येथील धनगर समाज व ग्रामस्थांच्या वतीने धनगर समाजाचे व इतर समाजाचे आराध्य दैवत . महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महालिंगराया देवस्थान येथे आमदार भारत भालके यांना तात्काळ  कोरोना या आजारांतून बरे व्हावे यासाठी येथील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी महालिंगराया दैवताला  दुग्ध अभिषेक घातला आहे यावेळी बिरोबाच्या नावानं चांगभलं व महालिंगरायांच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मधुकर गंगमई, उमाकांत कनशेट्टी, श्रीकांत सोमुत्ते( वडीयार ) अमीर आतार ( पत्रकार),मारुती पेटर्गे 





(धनगर युवा नेते),शामराव गंगमई, सिद्धाप्पा पुजारी, दत्ता गंगमई,शामराव पुजारी, तुकाराम येड्डे, बाळासाहेब येड्डे, बाळासाहेब सोमुत्ते बप्पण्णा पेटर्गे,शिरयप्पा पुजारी शामराव पेटर्गे ,म्हाळाप्पा पुजारी ,शिवाप्पा कोटे , बिराप्पा खुटेकर , अविनाश कोरे,यल्लाप्पा येड्डे,कांतु घुले,म्हाळाप्पा कोळुले किसन बरडे अविनाश पेटर्गे दादू मणेरी व इतर समाज बांधव आमदार भारत भालके यांना दोन दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी तालुक्यात बसली होती यामुळे तालुक्यातून अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ वतीने वेगवेगळ्या देवस्थान अभिषेक व इतर मागण्या केले आहेत मात्र आज सकाळी पुजारी ग्रामस्थांवर धनगर समाजाचे कार्यकर्ते व पुजारी महालिंगराया मंदिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते फोटो ओळी मंगळवेढा पंढरपुर विधानसभेचे आमदार भारत नाना भालके यांना कोरोना झाल्यामुळे 






त्यांना तात्काळ बरे व्हावे यासाठी हुलजंती तालुका मंगळवेढा येथे बिरोबा देवस्थान यास कार्यकर्ते व पुजाऱ्याने महालिंगराया या दैवतास दूध अभिषेक घातला आहे  हुलजंती गावचे माजी सरपंच मधुकर अण्णा गंगमई यांनी महालिंगराया व बिरोबा ला लवकरात लवकर बरे व्हावे असे देवाला साकडे घातले आहे.

No comments:

Post a Comment